शनिवार, ऑक्टोबर १५, २०२२

18 ऑक्टोबर रोजी भव्य सत्संग सोहळा व अमृततुल्य हितगुजाचे आयोजन
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ श्री गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.नाशिक व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार साप्ताहिक केंद्र(दिंडोरी प्रणित) चंद्रपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. १८ ऑक्टोंबर २०२२ मंगळवारी सकाळी ठिक १०.३० वाजता श्री चंद्रकांतदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सत्संग सोहळा व अमृततुल्य हितगुजाचे आयोजन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र श्री स्वामी समर्थ बालोद्यान श्रद्धा नगर, चर्च रोड, देवी अपार्टमेंट समोर, तुकूम, ता. जि. चंद्रपूर इथे करण्यात आले आहे करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज सजिव स्वरुपात प्रातःस्मरणिय परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी विश्वकल्यानात्मक, राष्ट्रीय उन्नतीसाठी अनेक यशस्वी अभियान राबविले आहेत. त्यांची अनुभूती सर्वजण घेतच आहेत, त्याच्या या विश्वात्मक तळमळीतून अनेक कार्यक्रमाचे प्रकटीकरण झालेले आहे.

त्याच अनुषंगाने आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, स्वयंमरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता, मानवाच्या विविध समस्या इत्यादी सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर श्री गुरुमाऊलींचे परम श्रद्धेय सुपूत्र आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे यांचे प्रबोधनात्मक हितगुज(मार्गदर्शन) करणार आहेत. तसेच *२०% आध्यात्म आणि ८०% समाजकार्य* या उक्तीनुसार मोफत आरोग्य शिबीर, मोफत औषधी वाटप, महावस्रदान, अन्नदान, स्वच्छता अभियान यासारखे अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे यांच्या विचारांचे सिंचन आपण आत्मसात करुन भाविकांनी व सेविकाऱ्यांनी आपले जीवन उन्नत करून घ्यावे असे आव्हाहन सर्व आयोजकांनी श्री खुशाल लोडे, स्थानिक जिल्हा निरीक्षक श्री अशोक सुतार, जिल्हा प्रतिनिधी श्री केशव बोकडे, जिल्हा सह प्रतिनिधी श्री दीपक गोरख, सर्व केंद्राचे केंद्र प्रतिनिधी, तसेच तुकूम केंद्र ता.जि.चंद्रपूर चे सेवेकरी श्री शरद कासावार, श्री टिकले काका, श्री मनोज पिदुरकर, श्रिमती लसुंते ताई, श्री स्वप्नील बदकी आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) चंद्रपूर जिल्हाच्या सर्व सेवेकर्यानी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.