यवनाश्व गेडकर राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर २८, २०२२

यवनाश्व गेडकर राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित |चंद्रपूर (प्रतिनिधी)- 

नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे द्वारा देण्यात येणारा  नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार  ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांना  देण्यात आला आहे.  Yavnashwa Gedkar

 चंद्रपूर निवासी यवनाश्व गेडकर हे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक असून त्यांचे ' आणि असा मी घडत गेलो, स्मरणातली निरंजना, स्मृती सुगंधाची गुंफण ' असे तीन साहित्यकृती प्रकाशित झालेली आहे. नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालयाच्या वतीने धोडींबा फुगे मैदान सभागृह भोसरी पुणे येथे आयोजित समारंभात ज्येष्ठ कवी उदय सर्पे(सिंधुदुर्ग),नक्षत्राचं देणं चे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवने , उद्योजक विजयशेठ फुगे, प्रा.शंकर घोरपडे, कवयित्री सौ. अलका नाईक(मुंबई),प्रा.दिलीप गोरे,गणेश डबडे,प्रा.डाॅ.राजेंद्र झुंजारराव,रामदास घुंगटकर  इ.मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे,पियुष काळे,प्रमोद डोंगरदिवे,गणेश डबडे,रामदास हिंगे,सौ.प्रीती सोनवणे,अप्पा घुले,यशवंत घोडे,सौ.डाॅ.अलका नाईक,सौ.दिव्या भोसले,यशवंत गायकवाड,सौ.अनिता बिराजदार इ. पुढाकार घेतला.


Yavnashwa Gedkar honored with State Level Nakshatra Sahitya Gaurav Award