Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

कोंबड्यांच्या बेंद्यात अडकला बिबट▫️वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास केले पिंजऱ्यात जेरबंद

▫️शहरातील खापरी वार्डातील घटना

शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती : शहरातील खापरी वार्ड येथील साई नगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी असलेल्या पाळीव कोंबड्यांच्या कोठोड्यात (बेंड्यात) पहाटे साडे ४ वाजताच्या सुमारास अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केल्याने तो अखेर तो तेथे अडकला.त्यामुळे त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली.दरम्यान बिबट्याने कोठोड्यात असलेल्या काही कोंबड्यांना आपले भक्ष बनविले.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची चमू,इको - प्रो, सार्ड, आरआरआर व आरआरटी च्या चमूने दाखल होऊन सकाळी ५ ते साडे १० वाजेपावेते रेस्क्यु टीम ऑपरेशन राबऊन अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.
सदर बिबट हा अडीच वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे,वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे, संदीप जीवने, अमोल दौलतकर, दीपक कावटी व त्यांची चमू, सार्डचे अनुप येरणे व त्यांची चमू, आरआरआर व आरआरटी या टीमने रिस्क्यु ऑपरेशन मोहीम राबऊन तब्बल साडे ५ तासानंतर अखेर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले. पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्या निसर्गमुक्त करण्यात आले. यामध्ये रविकांत खोब्रागडे,भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनसंरक्षक धनराज गेडाम,वनरक्षक,वन कर्मचारी, वन मजूर सार्डचे इम्रान खान, अमोल कुचेकर, सोनू कूचेकर, प्रणय पतरांगे, पंकज कूचेकर, इको-प्रोचे संदिप जीवने, अमोल दौलतकर, दिपक कावठी आदींचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.