यवनाश्व गेडकर यांना राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार जाहीर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२

यवनाश्व गेडकर यांना राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

यवनाश्व गेडकर यांना राज्यस्तरीय नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
चंद्रपूर (प्रतिनिधी)-
नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे द्वारा देण्यात येणाऱ्या नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कारासाठी चंद्रपूर येथील ज्येष्ठ लेखक श्री. यवनाश्व गेडकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत पुरस्कार येत्या १८ सप्टेंबर रोजी भोसरी पुणे येथे राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिलीत देण्यात येणार आहे, अशी माहिती काव्य मंचाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी दिली.  
    चंद्रपूर निवासी यवनाश्व गेडकर हे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक असून त्यांचे ' आणि असा मी घडत गेलो, स्मरणातली निरंजना, स्मृती सुगंधाची गुंफण ' असे तीन साहित्यकृती प्रकाशित झालेली आहे. त्यांच्या लेखनकृतीची दखल यापुर्वी झाडीबोली साहित्य मंडळानी घेतलेली असून त्यांना  चंद्रपूर चे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आत्मकथन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 
    राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, नामदेव गेडकर, नारायण सहारे,  अरूण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे, डॉ. श्रावण बानासुरे, ऍड. राजेंद्र जेनेकर, विलासराव उगे, देवराव कोंडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.