राजुरा तालुक्यातील श्री सीद्देश्वर मंदिराचा होणार कायापालट - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, सप्टेंबर १९, २०२२

राजुरा तालुक्यातील श्री सीद्देश्वर मंदिराचा होणार कायापालट


*ना.मुनगंटिवार यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे दिले संचालकांना आदेश.*           

*माजी आमदार निमकर यांच्या पाठपुराव्याला यश.*


                        
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यातील देवस्थान व पर्यटनाशी संबंधित विविध विकास कामांसंबंधाने राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे समवेत सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे(14 सप्टेंबर 2022) रोजी आयोजित केलेल्या बैठकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील पुरातन हेमाळपंथी श्री सीद्देश्वर मंदिराच्या 12 ज्योतिर्लींग मंदिरांचे पुनरनिर्माण, ध्यानसाधना केंद्राची निर्मिती, भक्तनीवास, भव्य प्रवेशद्वार, सौंदर्यीकरण, सुशोभिकरण, अप्रोच रोड चे बांधकाम  करण्याकरिता बैठकीत चर्चा उपस्थीत केली. बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक श्री आतिश गर्गे यांना ना.मुनगंटिवार यांनी तीर्थक्षेत्राचे सर्वकष कामे मंजूर करण्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. सीद्देश्वर देवस्थाण हे प्रसिध्द तिर्थस्थळासह उत्कृष्ठ पर्यटन स्थळ व्हावे अशा सुचना दिल्या व संचालकांना प्रत्यक्ष जाऊन तिर्थस्थळाची त्वरित पाहणी करण्यास सुचित केले. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या कार्यकारी संचालक श्रीमती विनीता सिंघल, म.रा. पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक आतिश गर्गे, चंद्रपुर चे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री वायाळ, सा.बां.विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, सा.बां.विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार यांचे सह विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थीत होते.