श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधीनांदेड(बालाजी सिलमवार):- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ महिला श्रीमती नरसाबाई बापूजी संदुलवार वय 95 वर्ष यांचे आज दुपारी तीन वाजता रिम्स हॉस्पिटल आदिलाबाद येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी उद्या गुरुवार ला अंबाडी ता. किनवट येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे 

श्रीमती नरसाबाई यांना काल अन्न पचनाचा त्रास झाला तेव्हा गावातील एका डॉक्टरनी त्यांना इंजेक्शन दिल्याचे कळते. नरासाआजीस त्रास अचानक वाढल्याने त्यांना किनवट हून आदिलाबाद येथे हलविण्यात आले.आदिलाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्युसमयी त्या ९५ वर्षाचे होत्या.श्रीमती नरसाबाई संदुलवार यांना दोन मुले नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त वनअधिकारी श्री दासुजी संदुलवार,बालाजी देवस्थानचे सदस्य श्री लक्ष्मण संदुलवार यांचे मातोश्री तर लिंगी येथील सहशिक्षक श्री दत्तात्रय संदुलवाऱ सर,कृषि विभागातील नरेश संदुलवार,व्यंकटी संदुलवार,श्रीकांत संदुलवार यांची आजी होय.श्रीमती नरसांआज्जी यांच्या निधनाने संदुलवार परिवारावर शोककळा पसरला आहे.
*#भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏🏻*