SFI चा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे धडक मोर्चा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर २१, २०२२

SFI चा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे धडक मोर्चाजुन्नर /आनंद कांबळे : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ‌‌‌. एस.टी. बसस्थानक ते प्रकल्प अधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली, त्यानंतर कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना मागण्यांकडे लक्ष वेधले.अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला वसतिगृह प्रवेश तत्काळ द्या, बीडीटी व भत्त्या मध्ये वाढ करा, न्युक्लिअर बजेट अंतर्गत MSCIT, Typing व इतर कोर्सेस तात्काळ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चालू करा, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करा, वसतिगृहात अभ्यासिका, ग्रंथालय, संगणक लॅब, जीम सुरू करा, शिष्यवृत्ती तत्काळ वाटप करा, स्वयंम योजनेची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सहायक प्रकल्प अधिकारी के.बी. खेडकर, शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी के.एन. जोगदंड, व्ही.टी. भुजबळ, कार्यालयीन अधिक्षक वाय. ए. खंडारे, प्र.शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. दुरगुडे, लिपिक श्रीमती ए. यु. करंजकर, तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, एस एफ आय चे राज्य सचिवमंडळ सदस्य विलास साबळे, राज्य समिती सदस्य संदीप मरभळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली खमसे, अक्षय निर्मळ, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, वसतिगृह प्रतिनिधी योगेश हिले, भूषण पोकळे, निशा साबळे, भूषण पोकळे, शितल कोकणे, स्वप्निल ढेंगळे, बाळू दाभाडे, अनिल गवारी, अश्विनी सुपे, धनश्री हिले, प्रतिक्षा उगले, मिनेश मेंगाळ, तुषार गवारी, मनोहर पाडवी, कृष्णा पावरा, धनराज तोडसाम, संपत कवरे यांचा समावेश होता. Tribal Development Project Office

४ तास झालेल्या चर्चेत प्रकल्प कार्यालय पातळीवरील मागण्या मान्य करण्यात आल्या, तसेच धोरणात्मक मागण्यांवर प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.

आंदोलनात मान्य झालेल्या मागण्या पुढीलप्रमाणे:

१. अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला वसतिगृह प्रवेश देण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत कार्यवाही केली जाणार.

२. डी.बी. टी. व भत्ता वाढविण्यासाठी वरीष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवल्या आहेत. पाठपुरावा केला जाणार.

३. न्युक्लिअर बजेट अंतर्गत MSCIT, Typing व इतर कोर्सेस तात्काळ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चालू करण्यासाठी १५ लाख निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर लगेच कोर्सेस सुरु केले जाणार.

४. सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु तोपर्यंत जेथे आवश्यकता आहे, ते कर्मचारी नियुक्त केले जाणार.

५. वसतिगृहात अभ्यासिका, ग्रंथालय, संगणक लॅब व जीम या सुविधा १५ दिवसांत उपलब्ध करून दिले जाणार.

६. थकित शिष्यवृत्ती व स्वयंम योजनेची रक्कम मिळण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार.

७. ज्या वसतिगृहात आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही, तेथे १० दिवसांत पर्यायी व्यवस्था केली जाणार.

८. वसतिगृह पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन, विविध स्पर्धा या वर्षापासून घेतल्या जाणार.

या आंदोलनात जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, रोहिदास फलके आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.