बचतगटाची झाली महिला सहकारी पतसंस्था | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

बचतगटाची झाली महिला सहकारी पतसंस्था |

रणरागिनी महिला सहकारी पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद :  खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : छोट्याशा बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून आर्थिक उन्नती केली. आज या बचत गटाचे रूपांतर महिला सहकारी पतसंस्थेत होत आहे, ही कौतुकास्पद वाटचाल असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. MP Balu Dhanorkar


बाबूपेठ नेताजी चौक येथे रणरागिनी महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  inauguration of Ranragini Mahila Sahakari Credit Sanstha at Babupeth Netaji Chowk.

यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकर, माजी महापौर संगीता अमृतकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


या महिला बचत गटाच्या माध्यमातून या महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न होतील, अशा शुभेच्छा देखील खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.


महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक उन्नतीसाठी जो प्रयत्न झाला, तो भविष्यातही कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


The savings group became a women's cooperative credit institution