Ganeshotsav | विसर्जनाच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहतूक बंद - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ०४, २०२२

Ganeshotsav | विसर्जनाच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहतूक बंद


  Sarvajanik ganesh utsav in marathi

येत्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन होणार असून, चंद्रपूर शहरातील सर्व मूर्तीचे विसर्जन इरई नदीचे दाताळा रोड येथील पात्रावर होणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण वाहतूक मुख्य मार्गावरून बंद राहील, अशी माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. Ganeshotsav


जटपुरा गेट ते आझाद बगीचा चौक, गिरनार चौक, गांधी चौक परत तिथून जयंत टॉकीज चौक ते जटपुरा गेट, संत केवलराम चौकातून रामनगर मार्गे नदीच्या पात्राकडे विसर्जन मार्ग असेल. दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून दहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत हे मार्ग बंद असतील. या काळामध्ये कोणत्याही नागरिकांना कोणतेही वाहन उभे करण्यास किंवा चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना स्वतःची वाहने पार्क करण्यासाठी जागा नसेल त्यांच्यासाठी चांदा क्लब ग्राउंड, डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय, सिंधी पंचायत भवन, पठाणपुरा व्यायाम शाळा,  महाकाली मंदिर मैदान, येथे आपली वाहने पार्क करता येतील. chandrapur police विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही मुख्य मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा. नागपूरमार्गे पठाणपुरा येण्यासाठी छोटा नागपूरमार्गे दाताळा चौक, देवाळा मार्गे येता येईल. नागपूर रोडकडून बाबूपेठ कडे जाण्यासाठी बंगाली कॅम्प, बायपास मार्गे जाता येईल. मूल रोडकडून येणारी वाहने बंगाली कॅम्प, कामगार चौक बल्लारपूर मार्गाकडून चंद्रपूर शहरात येतील. miravnuk