शनिवार, सप्टेंबर २४, २०२२

अखिल शिक्षक संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी येथे धरणे आंदोलनजुन्नर /आनंद कांबळे         
 अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभर  आम्हाला शिकवू द्या या विशेष मागणीसह विविध प्रलंबित शिक्षकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले  दुपारनंतर या विविध मागण्याविषयासह मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांसकडे सोपवण्यात आले .
तसेच आपल्या सर्व मागण्या शासन स्तरावर पाठविण्यात येणार असून त्या मंजूर व पूर्ण व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या व यानंतर धरणे आंदोलन करण्यात येऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

         यानिमित्ताने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष  अनिलजी महाजन तसेच अखिल पुणे जिल्ह्याचे मार्गदर्शक  आनंदा मांडवे अखिल पुणे जिल्हा सरचिटणीस  सुभाष मोहरे तर जिल्हा प्रतिनिधी  सुदामराव उतळे  तसेच अखिल शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष  अशोकराव पठारे , रावसाहेब पवार  जुन्नर तालुका अखिल शिक्षक संघाचे अध्यक्ष विवेकजी हांडे तर सरचिटणीस मा.श्री. तुकाराम हगवणे आदी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते तर धरणे आंदोलनात विविध शिक्षक अखिल परिवाराचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.