"पैदागीर" मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला होणार प्रदर्शित - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

"पैदागीर" मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला होणार प्रदर्शित
नागपूर : उपराजधानीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत संजय जीवने हे अनेक दशके नाटय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा "पैदागीर" हा पहिला मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला नागपूर, विदर्भातील काही शहरात तसेच पुणे, कल्याण, दिल्ली सारख्या शहरांमध्ये एकाचवेळी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सांची जीवने यांना २०२१ मधील ११व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळालेला आहे. तत्पूर्वी "कॉन्स" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाने अनेक भारतीय चित्रपटांना मागे टाकून नामांकन प्राप्त केले. त्या महोत्सवात दाखविल्या गेलेल्या चित्रपटात हा एक चित्रपट होता.

या नंतर चित्रपट कधी रिलीज होतोय, याची उत्सुकता असलेले अनेक प्रेक्षक संपर्क करून विचारणा करीत होते. परंतु मधल्या काळातील कोरोना प्रादुर्भावामुळे आणि काही अडचणींमुळे चित्रपट प्रदर्शित करण्यास विलंब झाला. पॉकीटमारी करणाऱ्या गुन्हेगारास विदर्भात पैदागीर" असे म्हटले जाते. अशा पित्याच्या गुन्हेगारी विश्वापासून दूर ठेवीत मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मातेची संघर्ष कथा "पैदागीर" चे कथानक शोषितांसाठी शिक्षण हे दुःखातून मुक्ती मिळविण्याचे साधन आहे हे बाबासाहेबांच्या विचारांचे मुख्य सूत्र "पैदागीर" मधून संजय जीवने यांनी मांडले आहे. "
या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध संगीतकार अनिल कवडे यांनी संगीत दिले आहे तर गीतकार स्वतः संजय जीवने हेच आहेत. समाज माध्यमातून चित्रपटातील प्रसारित झालेली गाणी प्रेक्षकांना आवडीची ठरत आहेत.

चित्रपटात सांची जीवने, गौरव अंबारे, बाल कलाकार जय भगत, श्रीकांत बोरकर, सारनाथ रामटेके, हरीश गवई, श्वेता वाघमारे, वंदना जीवने, डॉ. निलकांत कुलसंगे यांनी भूमिका केल्या आहेत. कला दिग्दर्शक मनोज रंगारी, नृत्य दिग्दर्शक सुमीत राऊत, मेकअप आर्टीस्ट बाबा खिरेकर, वेषभूषा रचनाकार सदिच्छा जीलटे, मृण्मयी अलोणे तर सहाय्यक दिग्दर्शक रूपाली कांबळे, राकेश मेश्राम व निर्मिती व्यवस्थापक सम्यक अलोणे आहेत. सहनिर्माति म्हणून वंदना जीवने, सुरेंद्र आवळे, निर्मला वागधरे, यांमिनी नगराळे, भारती अलोणे, तारका जिलटे, किरण गजभिये, पंकज कांबळे, डॉ. शितल, पंकज मेश्राम यांनी हातभार लावलेला आहे. "पैदागीर" चित्रपट हा नागपूर (सुदामा, कमल टॉकीज), कामठी (गोयाक टॉकीज), चंद्रपूर (सिनेजॉय टॉकीज), पुसद (विजय टॉकीज), अमरावती (प्रभात टॉकीज), अकोला (न्यू रिगल सिनेमा), पुणे (सिटी प्राईड, मंगला सिनेमा), गल्याण (इनॉक्स मेट्रो मॉल), औरंगाबाद (खिनवासा थिएटर), गोंदिया (प्रभात टॉकीज) आणि दिल्ली (पीव्हीआर नारायणा) या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. Paidageer - Teaser | Sanchi Jiwane, Gaurav A, Harish G | Sanjay Jiwane | 16th September 2022 ... SUBSCRIBE to Zee