शेळ्या राखताना वीज पडून एकाचा मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

शेळ्या राखताना वीज पडून एकाचा मृत्यू
चंद्रपूर : गावाशेजारील स्मशानभूमीलगत शेळ्या चारायला गेलेल्या एका पन्नास वर्षीय इसमाचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (10सप्टेंबर) ला सायंकाळी साडेचारच्या सुमारास किटाळी (बोरमाळा) येथे घडली. रमेश हरी मेश्राम (50) असे मृतकाचे नाव आहे.
नागभीड तालुक्यातील किटाळी(बोरमाळा) येथील
रमेश हरी मेश्राम हा इसम स्वत:च्या शेळ्या गावालगत असलेल्या स्मशानभूमीकडे गेला होता. तो सायंकाळी साडेचारवाजता पर्यंत शेळ्या राखत असता सायंकाळच्या सूमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. दरम्यान स्मशाभूमीत लावण्यात आलेल्या खूर्चीवर हा व्यक्ती बसून असताना झाडालर विज पडून त्याचा मृत्यू झाला. लगतच्या झाडावर
वर विज कोसळली, झाडावर विज पडल्याचे निशान आढळून आले आहेत. त्याच्या सोबत शेळ्या राखण्यास्ठी अन्य दूसराही इसम गेला होता परंतु तो सुखरूप आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन श़विच्छेदनाकरीता नागभिड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मृतक रमेश मेश्राम याचे पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातीन असा परिवार आहे. विशेष म्हणजे तो घरचा कर्ता होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिस्थिती गरीबीची असल्याने महसूल प्रशासनाने तातडीने मृतकाचे कुटूंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
000