Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

सोमवार, सप्टेंबर १२, २०२२

Chandrapur Rain Update | मुसळधार पावसाने चंद्रपूर शहराला झोडपले

चंद्रपूर (Chandrapur) शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते बंद पडले. रस्त्यावर पाणी तुडुंब वाहू लागल्याने वाहतूक खोळंबले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता. या पावसामुळे आज गारवा निर्माण झालेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 11 सप्टेंबर रोजी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील श्री टॉकीज चौक ते बिनबा गेट मुख्य रस्त्यावर देखील पावसाचे पाणी साचल्याने मार्ग जलमय झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून येजा करताना गैरसोय झाली. खाल भागात राहणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये  काही घरांमध्ये पाणी घुसले. समाधी वाढ परिसरातील 22 चौक येथे नालीचे पाणी घरात घुसण्याचा प्रकार घडला.

CHANDRAPUR | चंद्रपूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले

चंद्रपूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी जमा झाले तर रस्ते देखील जलमय झाले. चंद्रपूर शहरातील बिनबा गेट मार्ग, सिटी हायस्कुल, तुकुम आणि वाहतूक शाखा परिसरात पावसाचे पाणी जमा झाले. अजूनही ढगांची गर्दी कायम असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रपुरात दुपारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. गेले पंधरा दिवस उघडीप दिलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. आज रविवार असला तरी गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतरचा सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची रस्त्यावर वर्दळ होती. दुपारपासून संततधार पावसाने चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील जनजीवन ठप्प केले. चंद्रपूर जिल्ह्यात एक जून पासून आजवर 102% एवढ्या पावसाची सरासरी नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात आधीच चारदा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच आता संततधार पावसाने उरलेसुरले पीकही हातून जाण्याचा धोका निर्माण झालाय. शहरातील केंद्रस्थानी असलेल्या भागात जलमय परिस्थितीमुळे मनपाच्या स्वच्छता कारभाराचे पितळ मात्र उघडे पडले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूरसह अमरावती, वर्धा, चंद्रपूर अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानुसार, या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि विदर्भासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज आणि उद्या सतर्कता बाळगण्याचं आवाहनही विभागाने केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण महाराष्ट्रातील परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार rain पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत पुढच्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी पाऊस सुरू असून पुढचे पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडत असून पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे शहर, सिंहगड, खडकवासला या भागांत दुपारनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील तीन ते चार तास पाऊस राहिल असाही इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 forecast by the Nagpur observatory of India Meteorological Department. 
 Nagpur observatory of India Meteorological Department. 


११ सप्टेंबर १६:१५ (पुढील ३ तास) विजांसह पाऊस: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.