चंद्रपूरच्या शोषणकर्त्याना जनता माफ करणार नाही-अँड.संदीप ताजने Municipal, Zilla Parishad, Nagar Panchayat elections - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२

चंद्रपूरच्या शोषणकर्त्याना जनता माफ करणार नाही-अँड.संदीप ताजने Municipal, Zilla Parishad, Nagar Panchayat electionsमनपा, जिल्हा परिषद, नगर पंचायतीच्या निवडणूका बसपा स्वबळावर लढणार

Municipal, Zilla Parishad, Nagar Panchayat elections
चंद्रपूर|  वनसंपदेने नटलेल्या तसेच ‘ब्लॅक डायमंड’ कोळशासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शासनकर्तेच ‘शोषणकर्ते’ झाल्याने जिल्हा अजूनही मागासला आहे. या शोषणकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये जनता माफ करणार नाही.जिल्ह्यात विकासाला बराच वाव आहे,मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी चंद्रपूरकरांचे हाल होत आहे.त्यामुळे जिल्हयाला न्याय मिळवून देण्याचे काम बहुजन समाज पार्टी करेले,असे आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबांनी आज, सोमवारी केले.पक्षाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय ‘शासक बनो’कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमातून उपस्थित कॅडरला संबोधित करतांना त्यांनी जिल्ह्यातील विद्यमान शासनकर्ते आणि राजकीय पक्षांवर टीकास्त्र डागले. यावेळी विचारपीठावर मा.प्रदेश प्रभारी नितीन सिंग साहेब, मा.प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, मा.प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
आगामी काळात होवू घातलेल्या चंद्रपूर महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणूका बसपा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा या कार्यक्रमातून मा.अँड.ताजने साहेबांनी केली. गेल्या महानगर पैलक निवडणुकीत बसपा चे ८ नगरसेवक निवडून आले होते.यंदा २५ नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष पक्षाने ठेवले असल्याचे अँड.ताजने म्हणाले. या निवडणूकांमध्ये तरुणांना प्राधान्यक्रमाने नेतृत्वाची संधी दिली जाईल. यासाठी त्यांना पक्षात ५०% भागीदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अँड.ताजने म्हणाले. याच युवाशक्तीच्या बळावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विद्यमान सरकारला धडा शिकवणार असल्याचे अँड.ताजने म्हणाले.ओबीसी बांधवांना योग्य भागीदार पक्षात देण्यात येईल, असे देखील प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.
‘ईडी’सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारात वाढ-नितीन सिंग
राज्यात भाजपने शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली आहे. पंरतु, राज्यात ‘ईडी’ सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.त्यामुळे शासनकर्त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन यावेळी प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंग साहेबांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यात विपुल वनसंपदा आहे. अशात मनुष्य आणि जंगली प्राण्यांमधील संघर्ष नेहमी बघायला मिळतो. वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशात पीडित कुटुंबियांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ केली जावी, अशी मागणी बसपाची असल्याचे मा.सिंग यावेळी म्हणाले. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करावी ,अशी मागणी देखील सिंग यांनी कार्यक्रमातून केली.


प्रदूषणमुक्तीसाठी पक्ष काम करणार-प्रमोद रैना
औष्णिक विद्युत प्रकल्प तसेच कोळशा खालीमुळे शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पंरतु, या प्रदूषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न महानगर पालिकेकडून केला जात नाही.चंद्रपूरकरांनी बसपाचा निळा झेंडा पालिकेवर फडकवला तर प्राधान्यप्रमाणने प्रदूषणमुक्तीसाठी नवीन माॅडेल राबवले जाईल, अशी ग्वाही मा.प्रमोद रैना साहेबांनी दिली.जिल्ह्यात जंगल पर्यटनासाठी देखील मोठा वाव आहे. याअनुषंगाने बसपा काम करणार असल्याचे देखील रैना म्हणाले.