Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०२२

शिंदे - फडणवीस सरकार विरोधात जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपूर : महाराष्ट्रात जवळ जवळ ९०% वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प निश्चित झाला असतांना शिंदे- फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला स्थलांतरित झाला. या प्रकरणात राज्य सरकार तोंडघशी पडल्यावर आता मात्र राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरा मोठा प्रकल्प राज्याला देणार आहे असे सांगून बेरोजगार युवकांना गाजर आणि लॉलीपॉप दाखवत आहे. अशा ईडी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने बेरोजगार युवकांना गाजर व लॉलीपॉप वाटप करत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी 3 वाजता महिला काँग्रेस ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले. देशातील मोठ मोठ्या उद्योजकांची पसंती महाराष्ट्रसारख्या समृद्ध राज्यात गुंतवणूक करण्याची असते. या प्रकल्पाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती. मग मागच्या एक महिन्यात असे काय झाले, की हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित झाला? असा कोणता दबाव राज्यसरकारवर आला? 

राज्यसरकारवर पंतप्रधान मोदी यांचा दबाव आल्यानेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. मोदींना महाराष्ट्राची प्रगती नको, तर केवळ त्यांना गुजरात आणि यावर्षीची गुजरातची निवडणूक महत्वाची वाटते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी सरकारने हा प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ दिला, असा आरोप चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी केला. 

या प्रकल्पामुळे एक लाख चौपन्न हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. त्याच बरोबर सव्वालाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार होता. रोजगाराची तर गेली पण त्याच बरोबर दुसरा प्रकल्प आणून रोजगार देऊ, असे गाजर राज्य सरकार तरुणांना देत आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना गाजर आणि लॉलीपॉप वाटप करण्यात आले अशी माहीती ठेमस्कर यांनी दिली. या आंदोलनाला उपाध्यक्षा सुनीता धोटे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षअनु दहेगावकर, शहर अध्यक्ष शालिनी भगत, लता बारापत्रे, नेहा मेश्राम, समीस्ता फारुकी, माला माणिकपुरी, किरण वानखेडे, पुष्पा सिडाम, निमंत्रिता कोकोडे, संगीता शंखपाल, जयश्री कावळे, मीनाक्षी मेश्राम, नेहा मेश्राम, अंकू बाई भोख्या, पदमा त्रिवेणी, लक्ष्मी गोदारी, मेहेक सय्यद, सीमा धुर्वे, विद्या बावणे, डेझि सोंडूले, तिरुबाई नाकोडे, सुनंदा संग्रामे, चंद्रकला वाघमारे, माला चक्रवर्ती, द्रौपदी गाडगे, कल्पना चाक्रवती, पदमा 
गड्मवार, समिंद्रा  बोरकर, हाजी अली, एजाज कुरेशी, सय्यद मोबीन, मुन्ना तावडे, बिराज नारायने, कैलास दुर्योधन, प्रतीक दुर्योधन, सारंग चालकुरे, विजय कांबळे, शिवम गोरगाटे, अनिता दातार, सुवर्णा खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

Movement of District Rural Mahila Congress against Shinde-Fadnavis government 
शिंदे - फडणवीस सरकार विरोधात जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसचे आंदोलन 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.