मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 सप्टेंबर रोजी चंद्रपूरला मुक्कामी | MNS chief Raj Thackeray Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 सप्टेंबर रोजी चंद्रपूरला मुक्कामी | MNS chief Raj Thackeray Chandrapur


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष राज साहेब ठाकरे येत्या 20 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात मुक्कामी येत आहेत. 

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे येत्या १८ सप्टेंबर रोजी नागपूरला येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये राजसाहेब ठाकरे चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्यांना भेट देऊन प. १८ आणि २३ सप्टेंबरपर्यंत राज ठाकरे विदर्भात असतील. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १८ सप्टेंबर रोजी ते नागपुरात दाखल होणार असून तब्बल ६ दिवस विदर्भात तळ ठोकणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौयाची तयारी करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद बडवार, बबलू पाटील, राजू उबरकर ही पाच सदस्सीय टीम नागपुरात येईल, नागपूर, अमरावती, चंद्रपूर या तीनही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकायाशी चर्चा करून विदर्भ दौऱ्याचं नियोजन केले जाणार आहे.
नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीनही महापालिकांवर मनसेचे विशेष फोकस केले जाणार असून या तीन शहरांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठका व व्यक्तिगत भेटीगाठी घेणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगण्यात येतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या प्रस्तावित दौन्याची तयारी सुरू झाली आहे.

*मनसे अध्यक्ष राज ठाकरे* यांच्यासाठी रवी भवन येथील ९ नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे हे १८, १९ सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असतील, त्यानंतर २० तारखेला चंद्रपूर येथे मुक्काम असेल. २१ आणि २२ तारखेला ते अमरावती येथे मुक्कामी असतील. २३ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वेने मुंबईला रवाना होतील.

त्यांचे 18 आणि 19 रोजी त्यांचा नागपुरात मुक्काम राहणार आहे.  20 सप्टेंबर रोजी ते चंद्रपूरला येणार असून मुक्काम असेल.  21 आणि 22 सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे असतील आणि 23 सप्टेंबर रोजी मुंबईला जातील.


महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे एकत्रित लढणार असल्याचे जवळपास ठरले आहे. याची चाचपणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे विदर्भात येत आहे. 


भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हल्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. सोबतच चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती आहे.


  MNS chief Raj Thackeray Chandrapur

  MNS chief Raj Thackeray Chandrapur