राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीसाठी रवाना - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीसाठी रवाना

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनसाठी आज चंद्रपुर, वरोरा, नागभीड,ब्रम्हपुरी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी दिल्लीसाठी रवाना झाले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने २००० हजार युवक हे राष्ट्रीय अधिवेशन साठी उपस्थीत असणार आहेत.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रिय अधिवेशना करीता रायुकॉं प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब भाई शेख यांच्या निर्देशानुसार  व प्रदेश कार्यअध्यक्ष नितीन भाऊ भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते  दिल्ली येथील अधिवेशना करीता निघाले.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वरोरा अभिजित प्रभाकरराव कुडे , तालुका अध्यक्ष दिनेश मोहारे, चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे, 

तालुका अध्यक्ष आश्विन उपासे, नागभिड शहर अध्यक्ष शाहरुख शेख, तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड व कार्यकर्ते युवक उपस्थित होते.

(Nationalist Congress Party) 

 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठक अत्यंत महत्त्वाचे असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची रणनीती यासोबतच सर्व विरोधकांना एकत्र आणण्याबाबत महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तसेच, जनतेसोबत संपर्क करण्याबाबतचे नियोजन देशभरात कार्यकर्त्यांचे संपर्क मेळावे भरण्याबाबत देखील निश्चिती या बैठकीतून केली जाणार आहे. देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 11 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना आणि राज्यातील कार्यकारणी सदस्यांना संबोधित करणार आहेत. (NCP President Sharad Pawar) marathi/maharashtra/city/mumbai/ncp-national-convention-in-delhi-for-two-days