नवरात्रोत्सवदरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचा सिक्का - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२

नवरात्रोत्सवदरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचा सिक्का

महाकाली महोत्सव निमित्त नवरात्रोत्सवदरम्यान

जन्मलेल्या कन्यांना महाकाली सेवा समिती भेट स्वरूपात देणार चांदीचा सिक्का

https://www.facebook.com/khabarbat.info
  

ऑक्टोंबरपासुन Chandrapur  आयोजित महाकाली महोत्सवा निमित्त बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर सिक्के माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी देण्याची घोषणा केली आहे.   


 #Mahakali Seva Samiti will gift a silver coin to girls born during Navratri Festival #
   चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकाली व येथील मंदिराची प्रचिती राज्यभरात पोहचविण्यासाठी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन तथा माता महाकाली भक्तांच्या वतीने स्थापण करण्यात आलेल्या माता महाकाली सेवा समितीच्या वतीने 1 ऑक्टोंबर पासुन माता महाकाली मंदिर पंटागणात चार दिवसीय भव्य श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सावत प्रसिध्द जागरणकारगायीकाभजन मंडळेकथा वाचक सहभागी होणार आहे. सदर महोत्सवा दरम्या बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रोत्सव दरम्यान चंद्रपूरात जन्मास येणा-या कन्यांना भेट  स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय माता महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर सदर सिक्के देण्याची जबाबदारी माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी स्विकारली आहे. सदर सिक्के महाकाली महोत्सवा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी 26 आॅक्टोंबर ते 4 आॅक्टोंबर या नवरात्रो उत्सवा दरम्या चंद्रपूरात जन्मलेल्या कन्यांच्या पालकांनी महाकाली मंदिराच्या कार्यालयात किंवा महाकाली महोत्सव सेवा समितीच्या मंडपात संपर्क साधण्याचे आवाहन माता महाकाली महोत्सवाचे संयोज आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.  

Mahakali Seva Samiti will gift a silver coin to girls born during Navratri Festival #