महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणीत मोठे फेरबदल; नवीन जिल्हाध्यक्ष कोण? #khabarbat #india #live - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर २८, २०२२

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणीत मोठे फेरबदल; नवीन जिल्हाध्यक्ष कोण? #khabarbat #india #liveमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीत खांदेपालट करताना राहुल बालमवार व मनदीप रोडे असे दोन जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले असून सचिन भोयर यांच्याकडे चंद्रपूर महानगर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राहुल बालमवार आणि मनदीपभाऊ रोडे यांना जिल्हा प्रमुखपदी बढती मिळाली आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी तीन विधानसभा विभागून देण्यात आल्या आहेत. शहर अध्यक्ष रोडे यांच्याकडे आता राजुरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर विधानसभेचा कार्यभार राहील. रोडे यांच्या जागेवर भोयर यांना शहर अध्यक्षपद मिळाले आहे. तर जिल्हाध्यक्ष दिलीप रामडेवार यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.


राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर सर्वच कार्यकारण्या बरखास्त होईल, असे संकेत मिळाले होते. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचालीसुद्धा सुरू झाल्या आहेत. मात्र, या फेरबदलात नव्यांना संधी न देता जुन्या पदाधिकाऱ्यांनाच नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Watch video on YouTube here: https://youtu.be/CDwuJUuQds0