सेवाभावी गुणवंत शिक्षक सन्मानाने आतार यांचा गौरव Honorable meritorious teacher Atar - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०२२

सेवाभावी गुणवंत शिक्षक सन्मानाने आतार यांचा गौरव Honorable meritorious teacher Atarजुन्नर /आनंद कांबळे

 श्री क्षेत्र पारुंडे (ता.जुन्नर )येथील श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ.बी.आतार यांना लायन्स क्लब इंटरनेशनल,पुणेच्या वतीने ऑटोकलस्टर हॉल - चिंचवड येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीष प्रभुणे यांच्या हस्ते " सेवाभावी गुणवंत शिक्षक" या सन्मानाने गौरविण्यात आले.
      त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा , प्रेरणा मिळावी या उद्दशाने लायन्स क्लब ऑफ जुन्नर - शिवनेरीच्या वतीने जुन्नर तालुक्यातील एका सेवाभावी शिक्षकाची निवड करण्यात आली होती.
    आतार यांनी ग्रामीण , आदिवासी भागात जवळपास ३५ वर्ष ज्ञानदानाचे काम केले.सेवेत असताना राजाराम पाटील वृध्दाश्रम , मतिमंद - दिव्यांग मुलांचे नंदनवन जीवन केंद्र , वै.गुरुवर्य कोंडाजीबाबा वारकरी संस्था , सावित्रीबाई फुले वृध्दाश्रम , माजी विद्यार्थी सलग्न गुरुदक्षिणा सोशल फाउंडेशन तसेच किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविणारी डिसेंट फाउंडेशन अशा प्रकारच्या सामाजिक संस्थेत सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे.
     या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ला.राजेश कोठावदे , पद्मश्री गिरीष प्रभुणे, प्रमुख अतिथी कवी अनंत राऊत,उपप्रांतपाल ला.सुनिल चेकर,झोन चेअरमन मिलिंद झगडे ,लायन्स क्लब ऑफ जुन्नर - शिवनेरीचे अध्यक्ष संतोष रासने,ज्येष्ठ लायन गणेश देशमुख,मनोज भळगट आदि मान्यवर, पुणे जिल्ह्यातील लायन पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.