पेट्रोलियम मंत्री ना. हरदिपसिंह पुरी चंद्रपूर दौऱ्यावर | Hardeep Singh Puri - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर १३, २०२२

पेट्रोलियम मंत्री ना. हरदिपसिंह पुरी चंद्रपूर दौऱ्यावर | Hardeep Singh Puriलोकसभा प्रवास योजनेअंतर्गत दि. २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर लोकसभेत क्लस्टर प्रमुख म्हणून केंद्रीय गृहनिर्माण, शहरी विकास तथा पेट्रोलियम मंत्री ना. हरदिपसिंह पुरी यांचा प्रवास होणार आहे. यादरम्यान चंद्रपुर व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विविध बैठका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

Hardeep Singh Puri 

या कार्यक्रमांच्या तसेच बैठकांच्या नियोजनासंदर्भाने आज चंद्रपुरातील रामबाग वनविश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली, याठिकाणी उपस्थित होतो. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे बारीकसारीक नियोजन करून प्रवासाअंतर्गत होणार्‍या बैठका/कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली.

यावेळी, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर संगटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री रविंद्र गुरनूले, महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षा सौ. अंजलीताई घोटेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, संगटन प्रमुख राम लाखीया, महानगर मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, सोमनकरजी, रवी लोनकर, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे यांचेसह आदि मंडळी आवर्जून उपस्थित होते. bjp