वाकोडीत कृषि विभागाकडून सोयाबीन पिकाबाबत शेतीशाळेत मार्गदर्शन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२

वाकोडीत कृषि विभागाकडून सोयाबीन पिकाबाबत शेतीशाळेत मार्गदर्शन

वाकोडीत कृषि विभागाकडून सोयाबीन पिकाबाबत शेतीशाळेत मार्गदर्शन





महागाव:- (बालाजी सिलमवार )                        राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजने अंतर्गत तालुका कृषि अधिकारी महागाव यांचे मार्गदर्शनाखाली मौजे वाकोडी ता.महागाव येथे शेतीशाळा घेण्यात आली.या शेतीशाळेत कृषि पर्यवेक्षक श्री.बि.जी.गडंबे ,आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.अविनाश वाघमारे व श्री.एस.ए.पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील पिवळा मोझकावरील व्यवस्थापनाबाबत, किडी व रोग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या शेती शाळेस वाकोडीचे उपसरपंच श्री.स्वप्नील विरखडे यांच्यासह शेतकरी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सदर शेतीशाळेत शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत कामगंध सापळे वाटप करून हे सापळे योग्य कशा पध्दतीने शेतावर बसवायचे या बाबत प्रत्यक्षात हे सापळे बसवून दाखविण्यात आले.या वेळी शेतकर्यांना विविध विषयांवर तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी वाकोडी चे कृषि सहायक श्री.पि.जी.बैनवाड यांनी फवारणी करतांना घ्यावयाची काळजी व कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देवून उपस्थितांचे आभार मानले.सदर शेतीशाळेस श्री.विनोद भगत,मारोती गावंडे, शिवाजी हातमोडे अतिश क्षिरसागर, रामराम सुरोसे,शब्बीर शे.बुरहान व कृषि मित्र मनोज भगत, सुरेश मोरे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.
Guidance in agriculture school about soybean crop from agriculture department in Wakodi