वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्यरात्री घेतली भेट | Forest Minister Sudhir Mungantiwar - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्यरात्री घेतली भेट | Forest Minister Sudhir Mungantiwar

राज्याचे वनमंत्री ना.सुधीरभाऊनी दाखवले माणुसकीचे दर्शन                                  


रानडुकराने गंभीर जखमी केलेल्या शेतकऱ्याची रात्री १२ वा. नंतर रुग्णालयात जाऊन घेतली भेट                       
चुनाळा येथील शेतकरी अजय नत्थु  कार्लेकर याला २ सप्टेंबर ला शेतात काम करीत असतांना रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे. ही महीती राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा येथील (३ सप्टेंबर) दौऱ्यात सुधिरभाऊ मनगंटीवार यांना सांगितली. परंतू राजुराच्या  कार्यक्रमाला उशिर झाल्यामुळे भेट घेता आली नाही. पण या घटनेची आठवण ठेऊन गडचांदूर चा कार्यक्रम आटोपून रात्री १२ वा. नंतर आवर्जुन दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली व रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व तसेच उपस्थीत असलेले उप विभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार वेळेत जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या. यावेळेस माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रभारी तहसिलदार गांगुर्डे, वनपरिक्षेत्राधीकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष  रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थीत होते. 
घटनेचे गांभीर्य, गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन रात्री १२ वाजताच्या नंतर येवढा उशिर झाला असतांना, एवढ्या मोठ्या पदावरचा मंत्री असतांना संबंधिताना फोन वर आदेश देऊन मोकळे झाले असते. परंतू तसे न करता सुधीर भाऊनी त्यांच्यामधे गरिबाप्रती असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही व प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणुनच सुधिरभाऊनी रात्री १२ च्या नंतर जखमी शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन माणुसकीचे दर्शन घडविल्याबद्दल नातेवाईक, रुग्णालयातील रुग्ण व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.