सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२

Zilla Parishad school | शाळेसाठी जिल्हापरिषदेवर आला विद्यार्थी आणि पालकांचा मोर्चा

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामपंचायतमध्ये भरणारी जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्या विरोधात विसापूर येथील नागरिक आणि विद्यार्थी यांनी आज पाच सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.  The Education Department | Zilla Parishad school | Visapur in Ballarpur taluka.जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना हा मोर्चा आल्याने एकच गोंधळ झाला. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या मागण्या समजून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. पटसंख्येचा अभाव आणि फंड नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आहे, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यावेळी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चेकरी नागरिकांना संबोधित केले आणि सदर जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तातडीने स्थगित करण्यात यावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी शाळा बंद प्रस्ताव रद्द झाल्याचे पत्र दिले.


The Education Department has decided to close the Zilla Parishad school in Visapur in Ballarpur taluka.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.