वैष्णवधामच्या गायकवाड परिवाराकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर २५, २०२२

वैष्णवधामच्या गायकवाड परिवाराकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटपजुन्नर /आनंद कांबळे
वैष्णवधाम - बुचकेवाडी (ता. जुन्नर )येथील माजी सरपंच किसनराव गायकवा गाड यांचे सुपुत्र आणि गुरुदक्षिणा सोशल वेल्फेअर वेल्फेअर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी शांताई फाउंडेशनच्या माध्यमातून आईच्या स्मृति प्रित्यर्थ वैष्णवधाम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी तील


एकूण ९५ विद्यार्थ्यांना तसेच पारुंडे येथील श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिरातील इयत्ता ५ वी व इयत्ता ६ वी तील एकूण १०५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मान्यवरांच्या उपस्थिती देण्यात आल्या.

याप्रसंगी माजी सरपंच किसनराव गायकवाड, माजी मुख्याध्यापक एफ .बी . आतार, वैष्णवधाम चे सरपंच सुदाम डेरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दगडू पवार,प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पवार, उपसरपंच सुरेश गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित बुचके,श्री ब्रहमनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक याकूब शेख, ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय अरकडे, तारा डुंबरे, कैलास दाभाडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला लोहकरे, हेमलता सासवडकर, उपशिक्षक लक्ष्मण जाधव , दातीर मॅडम, गणेश पवार,पर्णकुटी देवस्थानचे व्यवस्थापक शंकर पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय राजूरकर तर दत्तात्रय अरकडे यांनी आभार व्यक्त केले.