जुनोना तलाव परिसर स्वच्छ करण्यास सिईओंचा पुढाकार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, सप्टेंबर २२, २०२२

जुनोना तलाव परिसर स्वच्छ करण्यास सिईओंचा पुढाकार

गावा-गावात "स्वच्छता ही सेवा मोहीम"राबवा - सौ. वर्षा गौरकर
चंद्रपुर (प्रतिनीधी)दिनांक - 22/09/2022 चंद्रपुर जिल्ह्यात " 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर2022" या कालावधीत "स्वच्छता ही सेवा मोहीम" मोठ्या स्वरुपात जिल्ह्यतील गावा-गावात राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा गौरकर यांनी नुकतीच सर्व विभाग प्रमुख व जुनाना गावातील ग्रामस्थासह जुनोना तलाव परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक्ष श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला आहे. गावा-गावात "स्वच्छता ही सेवा मोहीम"राबवाविण्यात यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा गौरकर यांनी केले आहे.

चंद्रपुर तालुक्यातील जुनोना गावात पुरातन काळापासुन तलाव प्रसिध्द असुन याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात. तलावाचा परिसर अस्वच्छ होत असल्यामुळे ,येणा-या पर्यटकांना वाढलेल्या घाणी मुळे त्रास होतहोता. यासाठी गावात सभा घेवुन , तलाव परिसर श्रमदानातुन स्वच्छ करण्याचे ठरविण्यात आले . याकामात जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा गौरकर यांनी पुढाकार घेवुन , जिल्हा परिषदच्या सर्व विभाग प्रमुखासह जुनाना गावात आल्या. या ठीकाणी गावक-या एकत्रीत करुन , सौ. गौरकर यांनी स्वता हातात झाडु घेवुन ग्रामस्थांच्या सहभागातुन परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. यांच परिसरात वृक्षारोपन करुन ,परिसर नियमित स्वच्छ राखण्यासाठी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

यामोहिमेचे नियोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता किरण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहीती शिक्षण संवाद तज्ञ   कृष्णकांत खानझोडे यांनी जुनोना ग्रामपंचायतच्या मदतीने करण्यात आले. तलाव परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान मोहीमेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, पंचायत विभागाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोटे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे,पंचायत समिती चंद्रपुरचे गटविकास अधिकारी हटवार, पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार साजिद निजामी, संजय धोटे, मनोज डांगरे,  बंडु हिरवे, तृशांत शेंडे, प्रकाश उमक, पंचायत समिती चंद्रपुरचे बीआरसी अर्शिया शेख,किसन आक्कुलवार,जुनोना ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. कुळ्मेथे, ग्रामसेवक डाहुले यांनी श्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या मोहीमेत जुनोना गावातील महिला व पुरुष मोठ्यासंख्येने सहभागी होते.