गणेशाला निरोप : त्यांनी थाटला नवा संसार; गणेश आरतीने पार पडला विवाह | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

गणेशाला निरोप : त्यांनी थाटला नवा संसार; गणेश आरतीने पार पडला विवाह |


चंद्रपूर, | सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच शहरातील संजय नगरातील छत्रपती शिवाजी महाराज बाल गणेश मंडळाने एक मोलाचे कार्य केले. परिसरातीलच एका प्रेमी युगलाचे गणेश मंडपातच लग्न लावून दिल्याने गणेश मंडळातील सदस्यांचे कौतुक होत आहे. A love marriage 


चंद्रपुर शहरातील संजय नगर परिसरात सहदेव मंडल व संगीता मंडल हे प्रेमीयुगल राहतात. काही महिन्यांपासून या दोघात प्रेमसंबंध होते. याची माहिती गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा होती. अशातच गणेश आरती सुरू असतानाच हे प्रेमी युगल तेथे आले आणि आरती संपताच गणेश मंडळातील सदस्यांनी त्यांना लग्नाबाबत विचारणा केली असता प्रेमी युगलांनी सुद्धा होणार दिला.

Chandrapur-marrying-loving couple-Ganesh-Mandap
त्यानंतर युवक व युवतीच्या परिवारातील सदस्यांना बोलावून त्यांचे गणेश मंडपातच लग्न लावून दिले. दरम्यान या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. यावेळी मंडळातील रिजवान पठाण, लोकेश हिरवणे,मिथुन पंढरे, लूमन साहू, अक्षय साहू, वैभव राऊत यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.