कल्पनाताईंनी केले क्रांती चौकाला प्रकाशमय - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, सप्टेंबर १२, २०२२

कल्पनाताईंनी केले क्रांती चौकाला प्रकाशमय

क्रांती चौक येथील हनुमान मंदिर परिसरात हायमास लाईट लावून अंधारात असलेल्या परीसर प्रकाशमय करून दिले माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी.*
क्रांती चौक येथील हनुमान मंदिर परिसरात हायमास लाईट लावून देण्याबाबत वार्डातील नागरिकांची मागणी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांना करण्यात आली होती. माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी अंधारात असलेल्या परीसर प्रकाशमय करून देण्यासाठी हायमास लाईटची नगरसेविका असताना माननीय आयुक्तांना निवेदन दिले होते. त्या विषयाचा पाठपुरावा करून ते मंजूर करून लावून घेण्यात आले.
या शुभप्रसंगी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर समीतीचे अध्यक्ष श्री निर्मलसिंग ठाकूर , उत्तम ऊगे, मारुती ठेंगणे, बंडू रायपल्ले, व्यवहारे काका , योगेश जीवतोडे, मनीष पिपरे, गणेश पाचभाई, प्रशांत बागडे, सुधीर पिंगे, गणेश शेळके, शुभम बोढाले प्रामुख्याने उपस्थित होते.


 #chandrapur #light #prakash #kranti