Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश


चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश  

चंद्रपूर - शहरातील गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याने जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले (Deepak Belle ) आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वातावरण बिघडले होते. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (District Superintendent of Police Arvind Salve) तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक (Divisional Police Officer Sushil Kumar Nayak ) यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. 

९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी चंद्रपूर शहरातील सर्वांनी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपासून ही मिरवणूक निघाली. रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये श्री गणेश विसर्जन सोहळा सुरू होता. मात्र, जयंत टॉकीज चौकामध्ये चंद्रपूरच्या गणेश राजा गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यामुळे त्यावेळी वातावरण बिघडले. पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतापलेल्या चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले आणि कार्यकर्त्यांनी जटपुरा गेट परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, अशी भूमिका घेतल्याने वातावरण चिघडण्याची स्थिती निर्माण झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचारी आदेश रामटेक याला निलंबित केले. घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान झालेला प्रकार हा कॅमेरा देखील असेल, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या विनंतीला मान देत दीपक बेले यांनी आंदोलन समाप्त करत त्यानंतर मिरवणूक पुढे नेऊन गणेश मूर्तींचे विसर्जन केले. 

https://www.khabarbat.in/2022/09/ganesh-visarjan.html

Chandrapur - Jatpura Youth Ganesh Mandal president Deepak Belle and activists protested after the police lathi-charged Ganesha devotees during Ganesh immersion in the city.

District Superintendent of Police Arvind Salve | immediately suspended the policeman | assigned the responsibility to Sub Divisional Police Officer Sushil Kumar Nayak to investigate the entire case.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.