शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२

Chandrapur News update । चंद्रपूर शहरात 60 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळलीचंद्रपूर शहरातील मजली इमारत कोसळली #chandrapur #india #khabarbat #live

Chandrapur News update । चंद्रपूर शहरात 60 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळली

चंद्रपूर शहरात 60 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळली. यात1 व्यक्ती दबल्याची भीती आहे. घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालय परिसरात ही इमारत आहे. पुंडलिक पाटील आणि त्यांचे कुटुंब या इमारतीत वास्तव्याला होते. इमारत अचानक हलू लागल्याने कुटुंबातील व्यक्ती बाहेर आल्या. मात्र एक जण आतच अडकून राहिल्याने दबला गेल्याची भीती आहे. शाहीस्ता खान (42) असं मलब्यात अडकलेल्या महिलेचं नाव आहे. घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे पथक व पोलिसांनी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. जुनी व मोडकळीस आलेली ही इमारत असल्याने मनपाने रिकामी करण्याचा इशारा दिला होता. शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती आहे.याची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला पाचारण करण्यात आले असून शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान मलब्यात दबलेल्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Watch video on YouTube here: https://youtu.be/3l3YvQgHP3g

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.