सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२

Chandrapur Crime Update | गालावर मारल्याने मजुराने केली बांधकाम ठेकेदाराची हत्याचंद्रपूर - मजुराने बांधकाम ठेकेदाराला ठार केल्याची धक्कादायक घटना 3 सप्टेंबर ला घडली. समीर रत्नाकर भोयर मृताचे नाव आहे. Murder Chandrapur

मृतक समीर रत्नाकर भोयर हा बांधकाम ठेकेदार होता. समीर हा 2 सप्टेंबरला वाहनचालक संदेश कवाडेसोबत बाहेर गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी वाहनचालक संदेशने समीरच्या पत्नीला तुमचा पती दारू पिऊन पडला आहे, असे फोनवर सांगितले. समिरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाला होता. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. मात्र, शंका आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली.  3 सप्टेंबरला सकाळी समीर हा श्री टॉकीज चौकातील मजुरांच्या ठिय्यावर पोहचला असता, एक मजूर गजानन अल्लारवार हा झोपून होता. समीर ने त्याला झोपेतून उठविण्यासाठी त्याच्या गालावर 2 थापड मारल्या. गालावर थापड का मारली म्हणून गजाननने समीरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत समीरच्या गुप्तांगाला जबर मार बसल्याने समीर चा मृत्यू झाला. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पुलिस उपनिरीक्षक बाबा डोमकावळे यांनी प्राथमिक अहवालानुसार आरोपी गजाननवर हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली. पुढील तपास सहाय्य पुलिस निरीक्षक अतुल थुल करीत आहे. Chandrapur Police


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.