जोरदार पावसादरम्यान वीज कोसळून महिला ठार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

जोरदार पावसादरम्यान वीज कोसळून महिला ठार

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे आज दुपारच्या सुमारास शेत शिवारात वीज पडून एक महिला ठार व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शामला वासुदेव लोळे वय पन्नास वर्षअसे मृतक महिलेचे नाव आहे ज्योती निलेश पोहनकर वय 25 वर्ष असे जखमी महिलेचे नाव आहे.


तालुक्यात सर्वत्र धान पिकातील निंदणाचे काम सुरू आहे आज आवळगाव येथील नथुजी नरुले यांच्या शेतावर गावातील महिला शामला कोरे ज्योती पोहनकर यासह अन्य पाच-सात महिला निंदणाच्या कामाकरिता गेल्या होत्या आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नथुजी नरुले यांच्या शेतातील बांधावरील झाडाखाली महिला जेवण करायला बसल्या होत्या दरम्यान अचानक वीज कोसळल्याने श्यामला लोळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला व ज्योती पोहनकर ही गंभीर जखमी झाली घटनेची माहिती गावात पसरतात गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमी महिलेला आरमोरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मेंडकी पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आली विज पडून महिलेचा मृत्यू झाल्याने आवळगावात शोककळा पसरली आहे.
 Chandrapur brahmapuri avadgaon women rain