Chandrapur Accident | उभ्या रुग्णवाहिकेला दुचाकीची धडक; महिलेला नागपूरला हलविले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

Chandrapur Accident | उभ्या रुग्णवाहिकेला दुचाकीची धडक; महिलेला नागपूरला हलविलेचंद्रपूर (Chandrapur) -  उभ्या असलेल्या आपात्कालीन 108 रुग्णवाहिकेला भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्याची घटना राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली. यात एक महिला जखमी असून, नागपूर (nagpur) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुरभी रामगिरवार असे महिलेचे असून ती गांधी चौकात राहते.


प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा येथील आपात्कालीन 108 रुग्णवाहिका दुपारच्या सुमारास एका रुग्णाला चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी आली होती.  रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यावर रुग्णवाहिका चालक परतीच्या प्रवासावर निघाला.  मात्र राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोहचताच एक महिला वेगात दुचाकीने येत होती. अपघात होऊ नये म्हणून रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका अक्षरशः थांबवित त्या महिलेला आवाज दिला मात्र त्या महिलेचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. त्या महिलेने उभ्या रुग्णवाहिकेला धडक दिली. या धडकेत त्या महिलेच्या पायावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली, नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात पोहचविले.  शासकीय रुग्णालयात नेल्यावर तिला खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता मात्र प्रकृती बिघडल्यावर सुरभी ला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा तपास महाकाली पोलीस चौकी मधील पोउपनी विजय मुक्के, व पोलीस कर्मचारी रामदास चिताळे व संजय धोटे करीत आहे. Accident Chandrapur Police