चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या सीबीएन टीव्हीचा शुभारंभ | CBN TV - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ०४, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या सीबीएन टीव्हीचा शुभारंभ | CBN TV

सीबीएनच्या माध्यमातून उन्नत कार्यांना पाठिंबा मिळावा : मंत्री सुधीर मुनगंटीवार


सीबीएन टीव्हीचा थाटात शुभारंभन्यूज चैनलच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा, उन्नती करणाऱ्या कार्यांना पाठिंबा मिळावा आणि यासोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, ही अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या सीबीएन  टीव्हीचा शुभारंभ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात पार पडल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या.  News Network Siti Digital


चंद्रपूर शहरातील हौशी माध्यम प्रतिनिधींनी एकत्रित येऊन तयार केलेल्या न्यूज चॅनेलचा गणेशोत्सवाच्या पर्वावर श्रीगणेशा केला. या न्यूज चॅनलला भरभरून आशीर्वाद श्री गणेशाने द्यावा, हे चॅनल चंद्रपूर जिल्ह्याची जिल्ह्यातील नागरिकांची धडकन व्हावी, अशा शुभेच्छा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. 
जटपूरा गेट - रामनगर मार्गावरील श्री गणेश मंदिराच्या मागील कार्यालयात हा छोटेखाणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजर अली यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सिटी नेटवर्क्सचे मैनेजर श्री स्वप्निल पेठे, सिटी नेटवर्क्स एलसीओ पार्टनर श्री अजय सहारकर, श्री के सन्तोष, जनाब अकील शेख, श्री दिलीप रिंगने, श्री अविनाश बेले, श्री आकाश डोलस यांच्यासह सीबिएन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

Siti Network is one of India's leading business houses with multiple digital services. We serves broadband services, digital cable tv,