स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गणेश मंडळाचे स्वागत | Watch video on YouTube here: - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२

स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गणेश मंडळाचे स्वागत | Watch video on YouTube here:


Watch video on YouTube here: https://youtu.be/k-lnVHuJ5Lk

    गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून गणेश भक्तांसह गणेश मंडळांचे स्वागत केले. 

   यावेळी कल्याणी जोरगेवारमाजी नगर सेवक बलराम डोडाणीअजय जयसवालयंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारपयुवा नेते अमोल शेंडेअल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेनआदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेप्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवारअॅड राम मेंढेअॅड परमहंस यादवचंद्रशेखर देशमुखआशा देशमुखसायली येरणेसविता दंडारेसुजाता बल्लीआशु फुलझेलेनीलिमा वनकरआदींची उपस्थिती होती. 

  10 दिवसांच्या मुक्कामा नंतर आज गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही नागरिक व गणेश मंडळांच्या स्वागतासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. गणेश मंडळ स्वागत मांच्याजवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. राज्यावर कोसळलेले नैसर्गिक विघ्न दूर करून राज्याला संपन्नतेचे आणि भरभराटीचे दिवस येवोत अशी कामना बाप्पाला अखेरचा निरोप देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.