तरुण शेतकऱ्याची कीटक नाशक औषध पिऊन आत्महत्या - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

तरुण शेतकऱ्याची कीटक नाशक औषध पिऊन आत्महत्या

शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)

वरोरा : आपल्या स्वतःच्या घरीच एका तरुण शेतकऱ्याने  विष प्राशन करून आत्महत्या केली, आशिष वाल्मिक डेहाने(४२)रा. निलजई  येथील हा तरुण शेतकरी आहे 

         आज दि.१४/०९/२०२२रोजी सायंकाळच्या सुमारास  घरी कोणीही नसतांना  मृतकाची आई ही वरोरा येथे गणेश विसर्जना करिता आली होती तर पत्नी माहेरी होती, दीड महिन्या आधीच आशिष यांना मुलगा झाला होता, तर एक पाच वर्षांचा मुलगा वरोरा येथे शिकत होता, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आशिष डेहानेची आई वरोरा येथे होती ,घरी कोणी@आ1अही नसतांना आशिष डेहाने यांनी कीटकनाशक द्रव्य प्राशन करून घरीच आत्महत्या केली, आशिष डेहाने हे सदन शेतकरी असल्याचे समजते, मग आत्महत्या का करावी? हा संशयाचा विषय असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.