Birth Centenary Festival | स्व. छोटूभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर १३, २०२२

Birth Centenary Festival | स्व. छोटूभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगताजिल्ह्याचे नामवंत उद्योगपती, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे तपस्वी, दानशुर व्यक्तीमत्व व सामाजिक बांधीलकीतुन कार्य करणारे समाजसेवी असलेल्या स्वर्गीय छोटुभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांच्या सर्वसमावेशक कार्याचा गौरव केला. या समारंभास पूर्व केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल, पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दिक्षित, ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायण तिवारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आज चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ख्यातनाम शिक्षणतज्ञ, उद्योगपती व समाजसेवक स्व. छोटूभाई गोपाळभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

स्व. छोटूभाई गोपालभाई पटेल जी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, छोटूभाई पटेल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे त्यांचे स्मरण केले जात आहे. 


या प्रसंगी  पूर्व केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल म्हणाले, शिक्षण महर्षी छोटूभाईजी पटेल यांनी स्वतःला इतरांसाठी झोकून दिले आणि वंचितांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी आदर्श शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांचे जाळे विणले आणि त्यांचा प्रवास सुरू राहिला. आज ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख घेऊन पुढे जात आहे हे विशेष. मी स्वतः छोटूभाई गोपालभाई पटेल जी यांना विनम्र अभिवादन करतो.