वेकोली अधिकाऱ्याच्या घरातून 5 लाखांचा ऐवज लंपास - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर १३, २०२२

वेकोली अधिकाऱ्याच्या घरातून 5 लाखांचा ऐवज लंपास

चंद्रपुरातील नांदगाव पोडे येथील वेकोली वसाहतीत धाडसी चोरी


चंद्रपुरातील नांदगाव पोडे येथील वेकोली वसाहतीत सोमवारी रात्री धाडसी चोरी करण्यात आली असून वेकोली अधिकाऱ्याच्या घरातून 5 लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
Chandrapur Maharashtra India MH34 Maharashtra Wcl news

वेकोलीच्या नांदगाव पोडे येथील वसाहतीत वेकोलीचे अधिकारी आर के प्रसाद राहतात. सोमवारी गाढ झोपेत असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी प्रवेश करून त्याच्या कपाटमधून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम उडवली. दरम्यान सकाळी घरी चोरी झाल्याची माहिती प्रसाद यांना मिळताच त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला व अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Chandrapur Maharashtra 🚨 police PI sudhakar Ambhore