शर्मीलीचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, ऑगस्ट ०१, २०२२

शर्मीलीचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल

चंद्रपुरातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघीण शर्मिली आणि तिच्या बछड्यांना याची देहा याची डोळा हमखास पाहण्याची संधी...

शर्मिलीचा व्हिडीओ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हायरल होत असतो. तिचा आणि तिच्या बछड्याचा हा एक जबरदस्त व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे! शर्मिली वाघीण आणि तिच्या चिमुकल्या बछड्यांची मस्ती पर्यटकांना भुरळ घालते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघीण आणि ३ बछड्याचं वास्तव्य सध्या आकर्षणाचा केंद्र आहे. 

मागील महिन्यात शर्मिलीची ही पिल्लं २ महिन्यांची आहेत आई झोपलेली असताना अंगावर खेळताना दिसले. नाशिक येथून आलेले पर्यटक अनंत सरोदे यांनी कॅमेऱ्यात कैद तो क्षण केला होता.  अनंत सरोदे हे गेल्या १० वर्षांपासून ताडोबाला दरवर्षी येणाऱ्या हौशी पर्यटकांपैकी एक आहेत


सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी भागातील आहे.  शर्मिलीची पिल्लं सध्या छोटी असल्यामुळे दिवसभर आईच्या दुधावरच पोट भरतात, शर्मिलीच्या अंगावर खेळतांना आणि दूध पिणारी ही चिमुकली बछडी पर्यटकांसाठी मन मोहित करतात.