किशोर टोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप Social work event school student - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

किशोर टोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप Social work event school student
सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असणारे किशोर टोंगे यांचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन साजरा करण्यात आला.
किशोर टोंगे हे मूळचे भद्रावतीचे. सध्या ते पुणे येथे वास्तव्यास आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या हेतूने ते अनेक संस्थांच्या माध्यमातून गरजूंना मदत करीत असतात. त्यांची ही सामाजिक चळवळ भविष्यात देखील निरंतर सुरू राहावी, यासाठी श्री. किशोर टोंगे यांच्या मित्र परिवारातर्फे त्यांचा वाढदिवस वांढरी येथील अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी किशोर टोंगे यांना आपल्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व नाश्ता देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किसन नागरकर, प्रा. प्रमोद उरकुडे, हितेश गोहोकार यांची उपस्थिती होती.