Road Accident| भरधाव डिझेल टँकर कोसळली नाल्यात - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Road Accident| भरधाव डिझेल टँकर कोसळली नाल्यात

भरधाव वेगाने जाणारे डिझेल टँकर उलटून कोसळले नाल्यात, घुग्गुस-महाकुर्ला मार्गावरील घटना

भरधाव वेगाने जाणारे डिझेल टँकर उलटून नाल्यात पडल्याची घटना गुरुवारी सकाळी चंद्रपुर घुग्गुस मार्गावरील महाकुर्ला गावाजवळ घडली असून यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.संदीप यादव असे जखमीचे नाव असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.chandrapur police
मिळालेल्या माहितीनुसार चद्दा ट्रान्सपोर्ट कंपनीचे डिझेल टँकर डिझेल घेऊन चंद्रपुर घुग्गुस मार्गाने भरधाव वेगाने जात होते.अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रोडवर पलटी झाले.त्यानंतर बाजूला लागून असलेल्या नाल्यात जाऊन कोसळले.यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.पुढील तपास पोलीस करत आहेत.

chandrapur police | Chandrapur News 34 MH 34 | Ghughus News | Local News | Accident