Rajiv Gandhi birth Anniversary : स्व. राजीव गांधी ह्यांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही : दिलीप पनकुले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

Rajiv Gandhi birth Anniversary : स्व. राजीव गांधी ह्यांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही : दिलीप पनकुलेस्व. राजीव गांधी यांचे बलिदान हा भारत देश कधीच विसरणार नाही असे भावपूर्ण उद्गार प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी काढले. आज स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने राजीव गांधी चौक, वर्धा रोड, नागपूर येथील स्थापित पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. युवकांचे प्रेरणास्थान व महान नेता स्व. राजीव गांधी होते असे भावपूर्ण विचार प्रदेश सरचिटणीस मा. आमदार दीनानाथ पडोळे,प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिर कर यांनी व्यक्त केले.


राष्ट्रवादीचे कामगार नेते बजरंगसिंह परिहार, जानबाजी मस्के ह्यांनी राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेते होते असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी भाईजी मोहोड, मच्छिंद्र आवळे, ररवींद्र खडसे, बबलू चौहान, डॉ. अरुण राठी,सूरज बोरकर विजय मसराम, नवघ मंदार हर्ष प्रमोद रामेकर राजेश टेंभुर्णे गंगाधर प्रामुख्याने उपस्थित होते.