सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजनआज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये 🫅🏼राधाकृष्ण 🤴🏼वेशभूषा व दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 🫅🏼राधाकृष्ण🤴🏼वेशभूषा मध्ये नर्सरी पासून ते वर्ग पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यामधून प्रत्येक वर्गाचे प्रत्येकी दोन क्रमांक काढण्यात येऊन त्यांना बक्षीसे व भेटवस्तू देण्यात आल्या.

Chandrapur municipal corporation school 

तसेच दहीहंडी कार्यक्रमात वर्ग सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीने प्रयत्न केले, परंतु वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून दहीहंडी कार्यक्रमाचे रोख बक्षीस 501 रुपये व इतर भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नीत सर व इतर शिक्षकांच्या हस्ते रजिस्टर व बिस्किट वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक माननीय नीत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्य केले.Organized Shrikrishna Janmashtami program in Savitribai Phule Semi English School