खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ ऑगस्ट २०२२

खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

*खासदार बाळू धानोरकरांनी केली विशेष निधीची मागणी**राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामावर गडकरींशी चर्चा*
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प त्वरित मार्गी लागावे, यासाठी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आज दिल्लीत केंद्रीय ररस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विकास कामांसाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. Balu Dhanorkar 

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर विकास कामांशी संबंधित असलेल्या अडचणींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील खासदारांशी संवाद साधत आहेत. यावेळी खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या समजावून सांगितले. हा लोकसभा मतदारसंघ मागासलेला असून वन व आदिवासींचे प्रमाणही या मतदारसंघात अधिक असल्याने विशेष निधी यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार धानोरकर यांच्याशी सविस्तरपणे या मुद्यावर चर्चा केली व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.

MP Balu Dhanorkar met Nitin Gadkari