चंद्रपुरात दारूचा महापूर । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, ऑगस्ट ०३, २०२२

चंद्रपुरात दारूचा महापूर । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

 चंद्रपुरात दारूचा महापूर । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक  


नियमबाह्य़ मद्य विक्री, बेकायदा गल्लोगल्ली, रहिवासी भागात वाटण्यात आलेले मद्यविक्री परवाने, नियम फाट्यावर ठेऊन आर्थिक देवाणघेवाण करून धार्मिक स्थळे, शाळा-कॉलेज जवळ मद्य विक्रीला परवाने देण्यात आले या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सचिन भोयर यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी चंद्रपूर उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. तात्काळ सुधीरभाऊ यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना फोनद्वारे कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, सुधीरभाऊ यांच्या कार्यालयात मनसे पदाधिकारी,उत्पादन शुल्क अधीक्षक यांची एक तास बैठक पार पडली.  बैठकीत कडक कारवाई करण्याचे आश्वासन चंद्रपूर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार व मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. 

वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी मद्यविक्री दुकाने स्थानांतरीत करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली.  #mnsadhikrut #MNSVruttant