पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तात्काळ द्या : आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी MLA Pratibha Dhanorkar - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तात्काळ द्या : आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी MLA Pratibha Dhanorkar
शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन ) योजने अंतर्गत काम करणा - या कर्मचाऱ्या चे मानधन तात्काळ अदा करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार ( मध्यान्ह भोजन ) योजने अंतर्गत शालेत भोजन शिजवुन देणा - या स्वंयपाकी , मदतनीस व इंधन , भाजीपाला खर्चाचे मानधन मागील तीन महिन्यापासून थकीत आहे. या योजनेत काम करणा-या कर्मचारी या प्रामुख्याने महिला आहेत. त्यामध्ये विशेषत: विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत व बचत गटातील महिलांचा या मध्ये प्रामुख्याने समावेश आहे. यांना मिळणारे मानधन हे फार कमी असल्याने ते देखील मागील तीन महिन्यापासून थकीत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या योजनेअंतर्गत कर्मचा - यांचे थकीत मानधन तात्काळ देवून कर्मचा - यांस न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.