डोक्यामागे लावा मानवी मास्क आणि पळवा वाघ! चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

डोक्यामागे लावा मानवी मास्क आणि पळवा वाघ! चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग |

डोक्यामागे लावा मानवी मास्क आणि पळवा वाघ! चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग चंद्रपूर (Chandrapur) | जिल्ह्यात बिबटे आणि वाघांच्या हल्ल्यांना माणूस बळी पडत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जखमी झाले.  ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात मानवी-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आता नवी युक्ती शोधण्यात आली आहे. 


(The conflict between predating animals and their human neighbour is as old as the history of human race. human-wildlife conflicts are set to increase all over the Chandrapur District.  “Since Chandrapur has the highest number of tigers in the state, the number of conflict cases has increased. )


मानवी-वन्यजीव संघर्ष (Human WildLife Conflict) नियंत्रणासाठी आता अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी, मेंढपाळ तसंच इतर नागरिकांना १०० मानवी मास्क वाटण्यात आले. सिंदेवाही, मूल तालुक्यातील शेतकरी आणि मेंढपाळांना वाघांच्या, बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उलटे मास्क लावण्याची नवी युक्ती वापरली जात आहे. 


(Wearing a mask of a human face on the back of the head. This method, used successfully for years, appears to be losing its effectiveness as tigers have begun to discover this trick.)

 

वाघ, बिबटे मागून हल्ला करतात. त्यामुळे चेहऱ्याच्या मागे मास्क लावल्यास हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. मानवी चेहऱ्याचे मुखवटे व्यक्तीने चेहऱ्याच्या मागे लावल्यास वाघ, बिबटे यामुळे फसू शकतात. त्यांना माणूस आपल्याकडेच पाहत असल्याचं वाटेल आणि हल्ल्यापासून बचाव होऊ शकेल. ही मोहीम वन्यजीव संस्था, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने  (Bombay Natural History Society) सुरू केली आहे. या संस्थेकडून आता मानवी फेस मास्कचं वितरण केलं जात आहे. या अंतर्गत जंगलाशी सातत्याने संपर्क येणाऱ्यांना मानवी मुखवटे (Human Mask) देण्यात येतील. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (https://www.bnhs.org/) ही भारतातील प्राणिविज्ञान, जैवविविधता क्षेत्रात संशोधन, संवर्धन काम करणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे. हीची स्थापना १५ सप्टेंबर १८८३ रोजी झाली. 


उपाय             
  • पहाटेसकाळी qकवा सायंकाळी जंगलात प्रवेश करू नये.
  • जंगलात दुपारच्याच सुमारास जावे.
  • जाताना एकटे न जाता गटाने प्रवेश करावा.
  • जंगलात वन्यप्राण्यांचे आवाज ऐकूनच पुढे पाऊल टाकावे.
  • शारीरिकरित्या अशक्त व्यक्तींनी जंगलात जावू नये.
  • जंगलात असताना हातात काठी ठेवून आवाज करावा.

What is human-wildlife conflict and why is it more than just a conservation concern?