Local Breaking News | वाहनाला कुत्रा आडवा आल्याने दोघे मित्र गंभीर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

Local Breaking News | वाहनाला कुत्रा आडवा आल्याने दोघे मित्र गंभीर

Local Breaking News 

तहसील कार्यालयाजवळ एका वाहनाला कुत्रा आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. 24 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 1 वाजता घडली. विशाल विलास महारातळे (वय 25, रा. सिंधी महागाव) व झित्रू संभा गाडगे (वय 70 रा. बुरांडा ख.) या दोघांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. Chandrapur 

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र


मारेगाव (Maregon/ Yavatmal) येथे काम आटोपून आपल्या गावाकडे परत जात असताना विशाल आणि झित्रू हे दोघेही परत जात होते. मारेगाव येथील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील तहसील कार्यालयाजवळ दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. कुत्रा अचानक मध्ये आल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून गाडी कुत्र्याचा अंगावर गेली. गाडी पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मारेगाव येथील काही लोकांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर (Chandrapur) येथे पाठविण्यात आले.