जीवन समृद्धीची वार्षिक सर्वसाधारण सभा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

जीवन समृद्धीची वार्षिक सर्वसाधारण सभा

जीवन समृद्धी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पत संस्था सावली ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक २१ ऑगस्ट २०२२ ला संस्थेच्या सावली येथील कार्यालयात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्ष सौ. वंदना मेटांगले होत्या.सभेचे प्रास्तविक मानद सचिव देवेंद्र बांबोळे यांनी केले. नंतर संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे नरेंद्र पाटील सेवानिवृत्त शिक्षक, जिवन विकास विद्यालय हरांबा चे पुरुषोत्तम डोईजड सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विनायक कंट्रोजवर सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर, इंदिरा गांधी विद्यालय जुनासुरला चे सुधाकर डांगे सेवानिवृत्त शिक्षक, संत गजानन विद्यालाय पेंढरी चे ताडुरवार सर, इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा चे बोरकर सर, एकूण 6 सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, साडी, आणि ५ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. वर्ग १० वी तील गुणवत्ता प्राप्त पाल्य प्रथम क्रमांक रचित घनश्याम मेश्राम ९२.२० टक्के, व्दितीय क्रमांक संस्कृती सुनील चावरे ९०.६० टक्के, तृतीय क्रमांक आर्यन पुरुषोत्तम कनाके वर्ग १२ वि तील प्रथम क्रमांक आयुष गणपत वाढई, लक्ष सुभाष गेडाम ८१.८०, द्वितीय क्रमांक आदित्य अनिल भिमनवार ८१.३३, तृतीय क्रमांक पीपल अनिल बनकर ७१.५० संस्था कर्मचारी पाल्य इशानी छत्रपती गेडाम ७७.७३ या गुणवत्ता प्राप्त पाल्याचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीचा आलेख मानद सचिव देवेंद्र बांबोळे यांनी मांडला. तर प्रत्येक सभासदाच्या योगदाना मुळेच संस्था प्रगती करत आहे असे विचार मांडले. या प्रसंगी बी. डी. मोटघरे उपाध्यक्ष, एस. बी. डोईजड, जी. व्ही. कुलमेथे, आर.टी. खोब्रागडे, एल. पी. देवगडे, एस. पी. सोनवणे, एम. एम. सुरपाम, एस.एल.डांगे, सी.एन. कोचे. डी. आर . गिरडकर, एच. आर. कस्तुरे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. एस. बी. साखरे यांनी केले तर कुमारी एस. एच. झोडे यांनी आभार व्यक्त केले. सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे लिपिक छत्रपती गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले.