चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात चाकू हल्ला | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात चाकू हल्ला |
चंद्रपूर Chandrapur। आज दुपारी एक वाजता शहर महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहीते यांच्या कक्षात आलेल्या लक्ष्मण पवार या व्यक्तीने स्वतःवरच चाकूचा हल्ला केला. पोलिसांनी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. CCMC Chandrapur | Chandrapur municipal commissioner's office

लातुर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी लक्ष्मण पवार हा दुपारी आयुक्त कक्षात भेटीसाठी आला. मात्र, त्याचा आवेश बघून आयुक्तांनी सुरक्षा रक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षा रक्षक आता येताच पवार यांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला. यात ते जखमी झाले. मनपातील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या कक्षाकडे घाव घेतली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पवारला ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. तो मनोरुग्ण असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.